निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २३१
‘ताप आलेला असतांना सहजपणे पचणारा आहार हवा. मोड आलेली कडधान्ये, दूध, दही, काकडी, बटाटा, बीट, रताळी, सुरण यांसारख्या कंदभाज्या, फळे, तसेच विविध कोशिंबिरी हे सर्व पदार्थ पचायला जड असतात. त्यामुळे ताप आलेला असतांना असा पचायला जड असलेला आहार करू नये. ‘तापातून लवकर बरे होण्यासाठी काय करावे’, याविषयीची माहिती या मालिकेतील ‘लेखांक २१२’ यात दिली आहे. त्यानुसार आहार ठेवावा.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.८.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : http://bit.ly/ayusanatan