निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २३३
‘अंगावर पित्त उठून खाज येत असल्यास चमचाभर खोबरेल तेलात किंवा कोणत्याही खाद्य तेलात चिमूटभर मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा असे एकत्र मिसळून हे तेल खाज येणार्या भागी लावावे. याने खाज येणे लगेच थांबते. हा तात्कालिक उपचार आहे; परंतु वारंवार पित्त उठत असल्यास तज्ञ वैद्यांकडून उपचार घ्यावेत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.८.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan