निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २२८
‘आजकाल सर्वांच्याच घरात सोफा असतो. सोफ्यावर बसल्यावर शरिराचा भार चुकीच्या ठिकाणी पडतो. त्यामुळे नेहमी सोफ्यावर बसल्याने शरिराची संरचना पालटते आणि मान, पाठ, कंबर आदी दुखू लागतात. घरात सोफा असला, तरी स्वतः त्यावर कधीही बसू नये. सोफ्याचा वापर केवळ पाहुण्यांना तात्पुरते बसण्यासाठी करावा. ज्यांच्याकडे सोफा नाही, त्यांनी हे विकतचे दुखणे घरी न आणलेलेच चांगले. त्याऐवजी खुर्च्या वापराव्यात.’ – वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.८.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan