वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी ३ सहस्र ४० कोटी रुपये संमत

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – राज्यशासनाने वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळास एकूण प्रकल्पाच्या २६ टक्के सहभाग देण्याकरता ३ सहस्र ४० कोटी रुपये संमत केला आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नीतेश राणे यांनी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता.

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे ‘सॅटेलाइट पोर्ट’ म्हणून पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वाढवण बंदर विकसित करण्यात येणार आहे. हे देशातील सर्वांत मोठे बंदर असणार आहे. या प्रकल्पाचा एकूण व्यय ७६ सहस्र २२० कोटी रुपये इतका आहे. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या संयुक्त भागीदारीतून ‘मे वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड’द्वारे हे बंदर विकसित करण्यात येणार आहे. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण एकूण प्रकल्पाच्या ७४ टक्के, तर महाराष्ट्र सागरी मंडळ २६ टक्के व्यय करणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने याआधी महाराष्ट्र सागरी मंडळाला या बंदर उभारणीसाठी २६ टक्के रक्कम म्हणून ३ सहस्र ४० कोटी रुपये निधी दिला आहे.