दाजीपूर ते राधानगरी रस्ता १० मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत वाहतुकीस बंद

या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवली 

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड-निपाणी मार्गावरील दाजीपूर, राधानगरी, मुदाळतिठा, निढोरी, निपाणी ते कलादगी या रस्त्याची दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे १० मार्च ते ३० एप्रिल २०२५ या ४५ दिवसांच्या कालावधीसाठी ‘दाजीपूर ते राधानगरी’ रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करण्याचा आदेश कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्गमित केला आहे.

या कालावधीत हलक्या आणि लहान वाहनांनी वालिंगा- महे पाटी-कोते- धामोड- शिरगाव-तारळे-पडळी-कारिवडे ते दाजीपूर या रस्त्याचा वापर करावा. अवजड आणि मोठ्या वाहनांची वाहतूक या रस्त्यावरून पूर्णपणे बंद असणार आहे. कोकणातून  कोल्हापूरकडे येणारी अवजड वाहने फोंडा-कणकवली फाटा- नांदगाव- तळेरे- वैभववाडी- गगनबावडामार्गे कोल्हापूर अशी वळवण्यात यावीत, तसेच कर्नाटक राज्यातून येणारी अवजड वाहने कोकणामध्ये जाण्यासाठी आंबोली-आजरा-गडहिंग्लज आणि संकेश्वर-गडहिंग्लज-आजरा-आंबोली या मार्गे वळवण्यात यावीत, असे या आदेशात नमूद केले आहे.