प्रेमभाव आणि गुरूंप्रती भाव असलेला ५४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला पाथरे (बु.), ता. राहाता, जि. अहिल्यानगर येथील चि. जयवर्धन पंकज घोलप (वय ५ वर्षे ) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. जयवर्धन पंकज घोलप हा या पिढीतील एक आहे !

फाल्गुन शुद्ध द्वितीया (१.३.२०२५) या दिवशी पाथरे (बु.), ता. राहाता, जिल्हा अहिल्यानगर येथील चि. जयवर्धन पंकज घोलप याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे कुटुंबीय आणि साधक यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

चि. जयवर्धन पंकज घोलप याला ५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून शुभाशीर्वाद !

चि. जयवर्धन घोलप

‘वर्ष २०२१ मध्ये ‘चि. जयवर्धन पंकज घोलप उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२५ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ५४ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२७.२.२०२५) ॐ


‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. श्री. पंकज घोलप (चि. जयवर्धनचे वडील), पाथरे (बु), ता. राहाता, जि. अहिल्यानगर.

१ अ. प्रेमभाव : ‘चि. जयवर्धनचे बोलणे अतिशय गोड आणि निरागस असते. आम्ही गावी गेल्यावर जयवर्धन त्याची आजी आणि पणजी (माझ्या आजीला) यांना जाऊन भेटतो आणि त्यांची प्रेमाने विचारपूस करतो.

१ आ. व्यवस्थितपणा : त्याला घरातही स्वच्छता, नीटनेटकेपणा आवडतो.

१ इ. संभाषण कौशल्य : तो भ्रमणभाषवर बोलत असतांनाही त्याच्या बोलण्यात एक प्रकारची प्रगल्भता जाणवते.’

२. सौ. स्वाती पंकज घोलप (चि. जयवर्धनची आई), पाथरे (बु), ता. राहाता, जि. अहिल्यानगर.

२ अ. वय २ ते ३ वर्षे

सौ. स्वाती घोलप

२ अ १. आज्ञापालन : ‘मी चि. जयवर्धनला आरोग्याला हानिकारक असलेल्या गोष्टींविषयी समजावून सांगितल्यास तो ऐकत असे.

२ आ. वय ४ ते ५ वर्षे

२ आ १. ‘साधक आमच्या घरी येणार आहेत’, असे कळल्यावर जयवर्धनला पुष्कळ आनंद होतो.

२ आ २. स्वावलंबी : तो स्वत:ची कामे स्वतः करतो, उदा. पिण्यासाठी पाणी घेणे, शाळेतून आल्यावर हात-पाय धुणे, कपाटातून कपडे घेणे, खाऊ खाल्ल्यावर रिकामे भांडे स्वयंपाक घरात आणून ठेवणे इत्यादी

२ आ ३. शिकण्याची आवड : तो शाळेतून घरी आल्यावर त्याला तेथे शिकवलेले सर्व मला म्हणून दाखवतो. तो खेळत असतांना मी त्याला ‘अभ्यास कर’ अशी आठवण केल्यावर तो त्याचा अभ्यास आनंदाने पूर्ण करतो. एकदा त्याला हनुमानचालीसा स्तोत्र म्हणता येत नव्हते; म्हणून त्याला पुष्कळ खंत वाटत होती. तेव्हा तो हनुमानचालीसा म्हणण्याचा तळमळीने प्रयत्न करत होता.

२ आ ४. व्यवस्थितपणा : जयवर्धन त्याचा अभ्यास झाल्यावर पटल आणि दप्तर व्यवस्थित आवरून ठेवतो. त्याला नीटनेटके कपडे हवे असतात. त्याच्या सदर्‍याची बाही मोठी होत असेल, तर तो ती व्यवस्थित दुमडून देण्यास सांगतो. त्याला सात्त्विक आणि स्वच्छ कपडे घालायला आवडतात.

२ आ ५. संभाषण कौशल्य : चि. जयवर्धन घरी येणार्‍या प्रत्येकच व्यक्ती समवेत अतिशय प्रगल्भपणे बोलतो. तो भेटणार्‍या नवीन व्यक्तीशीही सहजतेने बोलतो.

२ आ ६. संगीताची आवड : एकदा त्याने माझे गाणे ऐकले आणि त्याप्रमाणे माझ्या संगीत शिक्षिकेला म्हणून दाखवले. त्याला छत्रपती शिवरायांची आणि देशभक्तीपर गीते आवडतात.

२ आ ७. नामजपाची आवड : तो प्रतिदिन सकाळी शाळेत जाण्यापूर्वी श्री गणपति, कुलदेवी आणि दत्तगुरु यांचा नामजप करतो.

२ आ ८. देव आणि गुरु यांच्याप्रती भाव

अ. चि. जयवर्धनला श्रीकृष्णाचे भजन ऐकणे आणि म्हणणे पुष्कळ आवडते.

आ. तो शाळेत जाण्यापूर्वी आणि संध्याकाळी ‘शुभं करोति’ म्हणतो आणि त्यानंतर घरातील सर्वांना आनंदाने नमस्कार करतो.

इ. एकदा मी त्याला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र दाखवले आणि ‘हे कोण आहेत ?’ असे विचारले. तेव्हा तो मला म्हणाला, ‘‘आई, हे ना बाप्पासारखे दिसतात, ते बाप्पाच आहेत.’’

३. कु. प्रतिक्षा कोरगांवकर (साधिका), अहिल्यानगर, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र.

३ अ. प्रेमभाव : ‘तो भेटलेल्या व्यक्तीशी पटकन जवळीक साधतो. तो भ्रमणभाषवर बोलतो. तेव्हा त्याच्या आवाजामध्ये पुष्कळ प्रेम जाणवते.

३ आ. संभाषण कौशल्य : तो भ्रमणभाषवर बोलत असतांना त्याच्या बोलण्यात प्रगल्भता जाणवते.

३ इ. नामजपाची आवड तो नामजपासाठी देवासमोर बसतो. तेव्हा पुष्कळ एकाग्रतेने आणि मनापासून नामजप करतो. ‘कुटुंबियांनीही नामजप करावा’, असे त्याला वाटते.

३ ई. आज्ञापालन : एकदा मी जयवर्धनला नामजप करण्याविषयी सांगितले होते. त्यानंतर त्याने मला ‘नामजप किती आणि कोणता केला ?’, हे प्रांजळपणे सांगितले.’

४. स्वभावदोष : हट्टीपणा, रागीटपणा.’


जयवर्धन असे सर्व गुणांची खाण ।

श्रीमती भावना कदम

जयवर्धन असे सर्व गुणांची खाण ।
बोलणे त्याचे गोड आणि प्रेमळ ।। १ ।।

साधनेचे संस्कार झाले ।
गुरुमाऊलींच्या (टीप) कृपेने ।
घोषणा देई नि गीत गाई ।
देशभक्तीचे क्षात्रवृत्तीने ।। २ ।।

सांजवेळी होई लीन ।
देवाच्या नामस्मरणात ।
तत्पर असे शाळा गृहपाठ ।
अन् स्वत:ची कामे स्वतः करण्यात ।। ३ ।।

देव देश अन् धर्मप्रेमाचे ।
बीज त्याच्या अंतरी वसे ।
जयवर्धनवर सदैव राहो गुरुकृपा ।
हीच ईश्वरचरणी असे प्रार्थना ।। ४ ।।

टीप – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

– श्रीमती भावना कदम (चि. जयवर्धनची मावशी), नंदुरबार, जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्र.

(लिखाणातील सर्व सूत्रांचा दिनाक : २२.१.२०२५)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.