
१. प्रेमभाव
‘डॉ. पुष्पा दुकळे पुष्कळ प्रेमळ आहेत. मला त्या मोठ्या बहिणीप्रमाणे मार्गदर्शन करतात. आमच्या घरातील मंडळींची त्या आपुलकीने विचारपूस करतात.
२. प्रांजळपणा

मागील दोन वर्षे त्या प्रत्येक आठवड्याला मला त्यांच्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांचा आढावा द्यायच्या. त्यांच्याकडून जे प्रयत्न झाले नाहीत किंवा होत नाहीत, ते त्या प्रांजळपणे मला सांगायच्या.
३. सतमध्ये रहाण्याची ओढ
त्या सर्व ‘ऑनलाईन’ सत्संगांना उपस्थित रहातात. त्या म्हणतात, ‘‘सतमध्ये राहून मला चैतन्य मिळते.’’
४. प्रकृतीविषयी गार्हाणे न करता परिस्थिती स्वीकारणे
अनेक वर्षांपासून त्यांना ‘मधुमेह (डायबेटीस)’ आहे. मधुमेहामुळे त्यांच्या पायांच्या संवेदना अतिशय न्यून झाल्या असून त्यांना चालतांना, तसेच उठ-बस करतांना पुष्कळ त्रास होतो. त्यांचे पाय पुष्कळ दुखतात. एवढा त्रास होऊनही त्या त्यांच्या प्रकृतीविषयी कधीही गार्हाणे करत नाहीत. आहे ती परिस्थिती त्या आनंदाने स्वीकारतात.
५. ‘त्या सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात असतात’, असे मला जाणवते.’
– डॉ. (सौ.) संध्या गुपचूप (वय ७२ वर्षे), पणजी, गोवा. (६.३.२०२५)