उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! श्री. ऋग्वेद नीलेश जोशी हा या पिढीतील एक आहे !
‘फाल्गुन शुक्ल द्वितीया (१.३.२०२५) या दिवशी श्री. ऋग्वेद नीलेश जोशी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या आई-वडिलांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
श्री. ऋग्वेद नीलेश जोशी यांना १८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवारच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

‘वर्ष २०२० मध्ये ‘श्री. ऋग्वेद नीलेश जोशी महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२५ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२१.२.२०२५)
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. नम्रता
‘ऋग्वेद वडीलधार्या व्यक्तींशी नम्रतेने आणि आदराने वागतो. एखाद्या प्रसंगात त्याची चूक नसतांनाही त्याला कुणी बोलल्यास तो शांतपणे ऐकून घेतो. तो उलट बोलत नाही.
२. तो नवीन गोष्टी शिकण्याचा सतत प्रयत्न करतो.

३. प्रेमभाव
तो लहान मुलांशी प्रेमाने खेळतो आणि त्यांची काळजी घेतो.
४. वेळेचा सदुपयोग करणे
तो उपलब्ध वेळेचा सदुपयोग होण्यासाठी प्रयत्नरत असतो. तो शाळेत शिकत असतांना वर्गात शिक्षक आले नसल्यास अन्य मुलांशी गप्पा न मारता अभ्यास आणि नामजप करत असे. तो अन्य मुलांप्रमाणे खेळायला जाणे, फिरायला जाणे असे करत नाही. त्याच्या महाविद्यालयाला सुटी असल्यास तो घरातील कामे करतो.
५. आसक्ती नसणे
एकदा त्याच्या वर्गातील सर्व मित्र जत्रेसाठी जाणार होते. त्या वेळी ऋग्वेदला मित्रांना ‘येत नाही’, असे सांगून दुखवायचे नव्हते. त्यामुळे तो मित्रांच्या समवेत त्या जत्रेला गेला आणि तेथे ३० मिनिटे थांबून घरी आला. आम्ही त्याला लवकर येण्याचे कारण विचारल्यावर त्याने सांगितले, ‘‘माझे मित्र रात्री ऊशिरा उपाहारगृहात जेवायला जाणार होते. मला तिकडे जायचे नव्हते; म्हणून मी घरी आलो.’’
६. स्वीकारण्याची वृत्ती
आम्ही पुण्यातून लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथे रहायला आलो. पुणे येथे असलेल्या सुविधा आम्ही रहातो तिथे नाहीत; मात्र आमच्या दोन्ही मुलांनी त्याविषयी कोणतेही गार्हाणे केले नाही. त्यांनी साधना म्हणून परिस्थिती स्वीकारली.
७. सेवेची तळमळ
अ. मार्च २०२३ मध्ये त्याची इयत्ता १० वीची परीक्षा चालू असतांनाही तो प्रतिदिन सकाळी ६ वाजता सामूहिक ‘ऑनलाईन’ नामजप सत्संगासाठी सेवा करत असे.
आ. तो सेवेत सातत्य राखण्याचा प्रयत्न करतो. मार्च २०२३ मध्ये त्याला सेवेसाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात जायचे होते. त्यासाठी त्याने स्वतः आरक्षण केले आणि एकट्याने प्रवास केला. आता तो सेवेसाठी पुणे आणि गोवा येथे एकटाच जातो.’
– सौ. प्रीती नीलेश जोशी आणि श्री. नीलेश अच्युत जोशी (श्री. ऋग्वेदचे आई-वडील), लांजा, जिल्हा रत्नागिरी. (२१.४.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.