नवी देहली – देहली उच्च न्यायालयाने ‘बेवर्ली हिल्स पोलो क्लब’च्या ‘ट्रेडमार्क’च्या (चिन्हाच्या) प्रकरणी साहित्यांची ऑनलाईन विक्री करणार्या ‘अॅमेझॉन’ आस्थापनाला ३४० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. भारतीय अधिवक्त्यांनी या निकालाला ‘ऐतिहासिक’ म्हटले आहे; कारण ट्रेडमार्क प्रकरणात यापूर्वी कधीही अमेरिकी आस्थापनाला एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड ठोठावण्यात आला नव्हता.
वर्ष २०२० मध्ये ‘बेवर्ली हिल्स पोलो क्लब’च्या ‘हॉर्स’च्या (घोड्याच्या) ‘ट्रेडमार्क’ची मालकी असलेल्या ‘लाईफस्टाईल इक्विटीज’ या आस्थापनाने खटला प्रविष्ट (दाखल) केला होता. अॅमेझॉनच्या भारतीय संकेतस्थळावर हाच लोगो (चिन्ह) असलेले कपडे अल्प किमतीत विकले जात असल्याचा आरोप या आस्थापनाने केला होता. अॅमेझॉनच्या भारतीय शाखेने हा आरोप फेटाळला होता.