Towns Villages Named Aurangzeb : देशात औरंगजेबाच्या नावावर १७७ शहरे आणि गावे !

नवी देहली – देशात वर्ष २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार देशात क्रूरकर्मा मोगल बादशाह औरंगजेब याच्या नावावर किमान १७७ शहरे आणि गावे आहेत. देशभरात ६३ शहरे किंवा गावे यांना ‘औरंगाबाद’ असे नाव आहे. यांतील ४८ शहरे किंवा गावे उत्तरप्रदेशात आहेत. औरंगाबाद व्यतिरिक्त औरंगपुरा (३५), औरंगनगर (३), औरंगजेबपूर (१३), औरंगपोर (७) आणि औरंगबार (१) यांसह औरंगजेबाच्या नावाने असलेली ३८ गावे आहेत. यात ‘औरंगाबाद खालसा’, ‘औरंगाबाद दालचंद’ आदी प्रकारची नावेही आहेत.

१. उत्तरप्रदेशातील योगी सरकारमध्येही मोगल काळातील प्रतीकांची नावे वेगाने पालटली जात आहेत.

२. महाराष्ट्रात औरंगजेबाच्या नावावर २६ शहरे आणि गावे आहेत. बिहार तिसर्‍या स्थानावर आहे, जिथे १२ ठिकाणे औरंगजेबाच्या नावावर आहेत.

३. याखेरीज आंध्रप्रदेश मध्ये ४, गुजरात (२), हरियाणा (७), मध्यप्रदेश (७), राजस्थान (१), उत्तराखंड (३), बंगाल (१) अशी ७ इतर राज्ये अनेक गावे आणि शहरे औरंगजेबाच्या नावावर आहेत.

४. देहलीमध्ये काही वर्षांपूर्वी औरंगजेब रोडला माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले.

संपादकीय भूमिका

  • भारताला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे उलटून गेल्यानंतरही मोगलांच्या गुलामगिरीची नावे अद्याप न पालटणे, हे हिंदूंना आणि त्यांनी आतापर्यंत निवडून दिलेल्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद होय !
  • ‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर आतातरी ती पालटण्यात येतील का ? हाच खरा प्रश्न आहे !