Women Naxalites Killed In Gondia : गोंदिया येथे झालेल्या चकमकीत ४ महिला नक्षलवादी ठार !

३ रायफलींसह अन्य वस्तू जप्त

गोंदिया – बालाघाट जिल्ह्यात ‘हॉक फोर्स’ (नक्षलवादविरोधी सैन्य) आणि बालाघाट जिल्हा पोलीस दल यांची नक्षलवाद्यांसमवेत चकमक झाली. त्यात ४ महिला नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले. नक्षलवाद्यांकडून १ इन्सास रायफल, १ एस्.एल्.आर्. रायफल आणि एक ३०३ रायफल, तसेच दैनंदिन वापरातील इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

ठार मारण्यात आलेल्या ४ महिला नक्षलवाद्यांमध्ये २० लाख रुपयांचे इनाम असलेली भोरमदेव एरिया कमेटीची कमांडर आशा, तसेच प्रत्येकी १४ लाख रुपयांचे इनाम असलेल्या भोरमदेव एरिया कमेटीच्या सदस्या शीला उपाख्य पद्मा उपाख्य सरिता, रंजिता आणि लख्खे मडावी या महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. अन्य काही महिला नक्षलवादी घायाळ झाल्या आहेत. चकमकीनंतर घनदाट जंगलाचा लाभ घेऊन त्या पळून गेल्या. त्यांचा शोध घेण्यासाठी १२ पोलीस पथकांतील ५०० हून अधिक पोलीस शोध घेत आहेत.