पुणे – घरपोच मागवण्यात आलेल्या ‘चॉकलेट शेक’मध्ये उंदीर आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांकडून ‘चॉकलेट शेक’ देणार्या कॅफेमालकाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एका तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. (खाद्य पदार्थ सिद्ध करतांना योग्य ती काळजी न घेणार्या या कॅफेवर कायमची बंदी घालायला हवी ! – संपादक)