श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर) – शहरातील एका हॉटेलचालकाने १७ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी आरोपी स्वप्नील जैन याच्यावर ‘पोक्सो’ कायद्यानुसार १६ फेब्रुवारी या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी स्वप्नीलचे शहरातील ‘चायवाला’ हे हॉटेल पीडित मुलीच्या वडिलांनी फोडले. (पोलीस हे जनतेच्या रक्षणासाठी असतात. त्यांनी वेळीच गुन्हेगारावर कारवाई केली असती, तर जनतेला कायदा हातात घ्यावा लागला नसता ! – संपादक)
स्वप्नील हा एका गुन्हेगारी टोळीशी संबंधित आहे. तो मुलीच्या वडिलांना काही दिवसांपासून धमकावत होता. ‘पोलिसांत तक्रार करू नको, हत्या करीन, मुलीचे आयुष्य उद़्ध्वस्त करू’, अशा प्रकारच्या धमक्या वारंवार देत होता. शेवटी या धमक्यांना त्रासलेल्या पीडित मुलीच्या वडिलांनी लाकडी दांडगे घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील आरोपीचे ‘चायवाला’ या हॉटेलची तोडफोड केली.