|
कल्याण – येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात छत्रपती महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारील भिंतीला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून प्रतिवर्षी रंगरंगोटी केली जाते. या वर्षी पालिकेने येथील भिंतीला हिरवा रंग लावून हिंदूंच्या भावना दुखावल्या. यानंतर स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी विरोध केल्यावर हा रंग पालण्याचे काम चालू करण्यात आले.
हिरवा रंग लावतांना कुणाच्याच कसे लक्षात आले नाही ? हे अनवधानाने झाले कि मुद्दामहून करण्यात आले ?, असे प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
स्थानिक हिंदु जनजागृती या संघटनेने या कृत्याच्या निषेधार्थ संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिकाअसे करणारी महानगरपालिका पाकिस्तानात आहे का ? |