मुंबई विमानतळावर ६ किलो सोने आणि २१४७ कॅरेट हिरे जप्त !

आरोपी अटकेत

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंबई – सीमा शुल्क विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत ६ किलो सोने आणि २१४७ कॅरेट हिरे जप्त केले असून त्यांची किंमत सवानऊ कोटी रुपये आहे. आरोपी प्रवाशाने पट्ट्यामध्ये सोने लपवले होते. तसेच त्याच्या जवळील भ्रमणसंगणकात हिरे सापडले. गेल्या काही दिवसांत बँकॉकहून गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून त्यातील पैशांची हवालामार्फत देवाणघेवाण करण्यासाठी हिर्‍यांची तस्करी केली जात होती का या प्रकरणी अन्वेषण चालू आहे. या प्रकरणी प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. (अशा आरोपींना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! – संपादक)