|
मुंबई – प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया याने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमात पालकांच्या संदर्भात आक्षेपार्ह टिपणी केली होती. या प्रकरणी आसाम आणि इंदूर पोलिसांनी ‘बीअर बायसेप्स’ चॅनेलविरुद्ध तक्रार प्रविष्ट केली आहे. तसेच मुंबई पोलीस आणि राष्ट्रीय महिला आयोगाने रणवीर आणि समय रैना यांच्यासह ३० जणांना समन्स पाठवला आहे. महाराष्ट्र सायबर सेलने ‘इंडियाज गॉट लेटेंट’वर आलेल्या पाहुण्यांविरुद्ध तक्रार प्रविष्ट केली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या निर्देशांनुसार, या ३० जणांना १७ फेब्रुवारी या दिवशी आयोगासमोर उपस्थित रहावे लागेल. ही सुनावणी १७ फेब्रुवारी या दिवशी देहलीतील आयोगाच्या कार्यालयात होईल. रणवीर अलाहाबादिया, समय रैना, अपूर्व मखीजा, जसप्रीत सिंग, आशिष चंचलानी, कार्यक्रमाचे निर्माते तुषार पुजारी आणि सौरभ बोथरा यांसारख्या ‘कंटेंट’ निर्मात्यांनी केलेल्या अश्लील आक्षेपार्ह विधानाला आयोगाने गांभीर्याने घेतले आहे.
सायबर सेलने आयटी कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला असून या विनोदी कार्यक्रमाचे १८ भाग काढून टाकण्याची मागणी केली जात आहे.
रणवीर अलाहाबादिया याला कथित प्रेयसीने तिच्या सूचीतून काढले !मुंबई – रणवीर अलाहाबादिया याने पालकांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी त्याची कथित प्रेयसी असणारी निक्की शर्मा हिने त्याला ‘इंस्टाग्राम’ या सामाजिक माध्यमांतील तिच्या सूचीतून काढले (अनफॉलो केले) आहे. त्यांनी त्यांचे नाते कधीच जगासमोर उघड केलेले नव्हते. |
संपादकीय भूमिकाभारतीय संस्कृतीला निलाजरे ठरणारे विधान करणार्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी ! तसे केल्यासच अशा प्रकारच्या घटनांना आळा बसेल ! |