
प्रयागराज – महाकुंभमध्ये बिहारचे राज्यपाल आरिफ महंमद खान आले होते. महाकुंभची सर्व व्यवस्था आणि कुंभक्षेत्री असलेल्या भाविकांचा भाव पाहून ते म्हणाले की, महाकुंभमधील आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही, तर त्याचा अनुभव घ्यावा लागतो. महाकुंभ हे केवळ भारताचे प्रतीक नसून ते स्वतःमध्ये एकरूप होणारे आहे. संगम हे भारताच्या सार्वत्रिक आणि सर्वसमावेशक संस्कृतीचे नाव आहे. त्यात विविधतेचा आदर आणि स्वीकार हे दोन्ही आहे. ही भारतीय संस्कृती असून हा तिचा सण आहे.