‘गेल्या काही वर्षांपासून मी सपिंड महालय श्राद्ध करत आहे. वर्ष २०२४ मध्ये श्राद्धविधी करत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला आलेली अनुभूती देत आहे.

१. महालय श्राद्धाच्या प्रसंगी पिंडदान करतांना क्षणभर एक सुगंध जाणवणे
अ. २४.९.२०२४ या दिवशी झालेल्या महालय श्राद्धाच्या प्रसंगी पिंडदान करतांना मला क्षणभरासाठी एक सुगंध जाणवला. तो कापूर, उदबत्ती, तूप वगैरेंपेक्षा वेगळा होता. तसेच घरातही चैतन्य जाणवले.

आ. विशेष म्हणजे आलेल्या ब्राह्मणांनीही या वर्षीचे श्राद्ध सात्त्विक समाधान देणारे झाल्याचे बोलून दाखवले.
२. सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप यांनी साधकाला श्राद्धविधीत गंधाची अनुभूती आल्याचे ओळखणे आणि त्यामागील कारण सांगणे
२ अ. २६.९.२०२४ या दिवशी सूक्ष्म परीक्षण करणारे साधक श्री. राम होनप यांनी मला सहज संपर्क केला. मी त्यांना आदल्या दिवशी घरी श्राद्धविधी झाल्याचे सांगितले. त्यांनी मला विचारले, ‘‘काल विधीच्या वेळी तुम्हाला काही गंधाची अनुभूती आली का ?’’ मी त्यांना ‘‘हो’’, असे उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी विचारले, ‘‘गंध १ – २ सेकंद आला का ?’’ मी पुन्हा होकारार्थी उत्तर दिले. तेव्हा ‘याविषयी मी त्यांना काही न सांगता दादांनी ते सूक्ष्मातून ओळखले आहे’, असे मला जाणवले.
२ आ. याविषयी श्री. रामदादा म्हणाले, ‘‘विधीच्या वेळी तेथे देवता येतात. त्यामुळे आपल्याला दैवी गंधाची अनुभूती येते.’’
हे ऐकून माझी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त झाली आणि श्राद्धविधी करण्याचे अनन्यसाधरण महत्त्व माझ्या लक्षात आले.’
– श्री. दीपक रामचंद्र छत्रे (वय ५६ वर्षे), रायंगिणी, बांदोडा, फोंडा, गोवा. (२९.९.२०२४)
|