प्रयागराज कुंभपर्व २०२५

प्रयागराज, ३० जानेवारी (वार्ता.) – मौनी अमावास्येनिमित्त अमृतस्नानासाठी आलेल्या ३० भाविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला, तर ९० जण घायाळ झाले. या घटनेच्या दुसर्या दिवशी, म्हणजे ३० जानेवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत २ कोटी ६ लाख भाविकांनी त्रिवेणी संगम आणि गंगास्नान केले. त्यामुळे हिंदुद्वेषी राजकारणी, पुरोगामी, नास्तिकतावादी आदींनी या दुर्घनटेचे कितीही राजकारण केले, तरी हिंदु धर्मियांची श्रद्धा तसुभरही ढळलेली नाही, हेच या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

संपादकीय भूमिकादुर्घटनेचे निमित्त करून हिंदु धर्माची अपकीर्ती करणारे हिंदुद्वेषी राजकारणी, पुरोगामी आणि प्रसिद्धीमाध्यमे यांना भाविकांकडून सणसणीत चपराक ! |