Uniform Civil Code In Uttarakhand : उत्तराखंडमध्ये लवकरच लागू होणार समान नागरी कायदा !

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंड सरकार येत्या काही दिवसांत समान नागरी कायदा लागू करणार आहे. या संदर्भातील सर्व प्रकारची औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहे. राज्य मंत्रीमंडळानेही याला संमती दिली आहे. सरकारने संमती दिल्यानंतर उत्तराखंड देशातील समान नागरी कायदा करणारे पहिले राज्य ठरणार आहे. सध्या देशात गोव्यात हा कायदा असला, तरी तो पोर्तुगिजांच्या काळापासून तेथे लागू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील हा कायदा सर्व रहिवाशांना लागू असणार आहे. राज्यघटनेच्या कलम ३४२ आणि ३६६ (२५) अंतर्गत अधिसूचित अनुसूचित जमाती आणि संरक्षित व्यक्ती अन्  समुदाय यांना कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे. पुरुषाचे वय २१ वर्षे आणि महिलेचेे १८ वर्षे वय पूर्ण असेल, तर त्यांच्यामध्ये विवाह होऊ शकतो. विवाह कोणत्याही धार्मिक परंपरांनुसार किंवा कायदेशीर प्रक्रियेनुसार केला जाऊ शकतो; परंतु तो झाल्यापासून ६० दिवसांच्या आत नोंदणीकृत करणे बंधनकारक आहे.

संपादकीय भूमिका

एकेक राज्यांत समान नागरी कायदा करण्याऐवजी संपूर्ण देशासाठीच केंद्र सरकारने तो करणे आवश्यक आहे !