तिसर्‍या दिवशीही भाविकांची संगमस्नानासाठी रीघ !

प्रयागराज – महाकुंभपर्व चालू झाल्यापासूनच १५ जानेवारी या तिसर्‍या दिवशीही देश-विदेशांतील भाविकांची संगमस्नानासाठी रीघ लागली होती. १४४ वर्षांनंतर आलेल्या या महाकुंभपर्वास पौष पौर्णिमा अर्थात् १३ जानेवारीपासून आरंभ झाला. त्या दिवशी दीड कोटी आणि १४ जानेवारीला झालेल्या पहिल्या अमृत स्नानाला ३.५ कोटी भाविकांनी गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या पवित्र संगमात स्नान केले. हा महाकुंभपर्व जगातील सर्वांत मोठा धार्मिक सोहळा आहे.