Farooq Abdullah On Bangladeshi Hindus : “(म्हणे) ‘बांगलादेशात हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांविषयी मला काहीच ठाऊक नाही !’ – फारूख अब्दुल्ला

काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे हिंदुद्वेषी नेते फारूख अब्दुल्ला यांचे संतापजनक विधान

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – बांगलादेशात अल्पसंख्य हिंदूंवर धर्मांध मुसलमानांकडून सातत्याने होत असलेल्या आक्रमणांविषयी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांना पत्रकारांनी विचारणा केल्यावर ते म्हणाले की, यासंदर्भात मी काही ऐकले नाही, मला काही ठाऊक नाही. तुम्ही या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारा, असे सांगत कोणतेही विधान करण्याचे टाळले.

संपादकीय भूमिका

  • जे संपूर्ण जगाला ठाऊक आहे आणि त्यावर संपूर्ण जगातून विरोध केला जात आहे, ती गोष्ट ठाऊक नाही, असे सांगणार्‍या फारूख अब्दुल्ला यांना ‘हिंदूंवरील आक्रमणे योग्य आहेत’, असेच वाटत असणार; मात्र ते उघड सांगता येणार नाही आणि दुःखही व्यक्त करायचे नाही; म्हणूनच त्यांनी असे विधान केले,  हे लक्षात घ्या !
  • बहुसंख्य असणार्‍या हिंदूंच्या देशात असे मुसलमान नेते आहेत, हे हिंदूंना लज्जास्पद आहे. काश्मीरमधील साडेचार लाख हिंदूंना ३५ वर्षांपूर्वी हाकलले जात असतांना हेच नेते तेथे होते, यावरून त्यांच्यात हिंदुद्वेष मुरलेला आहे, हे स्पष्ट आहे !