‘जुलै २०२४ मध्ये मी धुळे ते अमरावती असा रेल्वे प्रवास करत होतो. मी या प्रवासासाठी आरक्षण केले होते. मलकापूर रेल्वेस्थानकाच्या येथे एक धर्मांध आमच्या डब्यात आला. त्याचे आरक्षण नसतांना तो आमच्या आसनावर बसण्याचा प्रयत्न करत होता. मी दुसर्या एका मुलाच्या साहाय्याने त्याला बसू दिले नाही; म्हणून तो आमच्याशी वाद घालू लागला. थोड्या वेळाने तो म्हणाला, ‘‘रूक, अकोला आने दे । देखता हूँ ।’’ नंतर त्याने इतर धर्मांधांना भ्रमणभाष केला. अकोला रेल्वेस्थानक आल्यावर १५ ते २० धर्मांध आमच्या डब्याच्या बाहेर खिडकीजवळ येऊन आरडाओरडा करू लागले. त्यांच्यामधील एक धर्मांध आत आला आणि माझ्या शेजारच्या त्या मुलासमवेत वाद घालू लागला.
माझ्या मनात विचार आला, ‘आता याची तक्रार करावी लागेल.’ जो धर्मांध प्रवास करत होता, तो दुसर्या धर्मांधाला माझ्याकडे बघून सांगत होता, ‘‘ये भी है ।’’ त्या वेळी त्याचे माझ्याकडे लक्ष गेले. मी त्याला एकच वाक्य म्हटले, ‘‘खाली उतर.’’ तो लगेच खाली उतरला. त्या वेळी ‘गुरुकृपा कशी कार्य करते’, हे माझ्या लक्षात आले. ‘प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) सूक्ष्मातून सतत साधकांसमवेत राहून त्यांचे रक्षण करतात’, याची मी प्रत्यक्ष अनुभूती घेतली. प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. अमोल वानखडे (वय ४४ वर्षे), अकोला. (जुलै २०२४)
|