‘व्हाईट हाऊस’पासून ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या घरापर्यंत साजरी होते आहे दिवाळी !
नवी देहली – जगातील अनेक देशांच्या मोठ्या नेत्यांनी ३० ऑक्टोबर या दिवशी दिवाळी साजरी केली आणि शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या ‘व्हाईट हाऊस’मध्ये दिवाळी साजरी केली जात आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी त्यांच्या निवासस्थानी दीप पेटवले. ब्रिटनमध्ये दिवाळी साजरी करणार्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
🪔 Diwali Unites the World! 🌎
World Leaders Join the Celebration! 🎉
From White House 🏛️ to 10 Downing Street 🏠, leaders celebrate the Festival of Lights!
Leaders across the globe are coming together to celebrate the Festival of Lights, promoting unity, diversity, and… pic.twitter.com/IZxknXq3ds
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 1, 2024
१. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी इंस्टाग्रामवर एक ‘पोस्ट’ प्रसारित करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘दिवाळी दिव्यांचा सण असून तो आनंदाने साजरा केला पाहिजे’, असेही त्यांनी म्हटले आहे.
२. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तान आणि जगभरात रहाणार्या हिंदूंना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
३. सुंयुक्त अरब अमिरातचे शासक शेख महंमद बिन झायेद यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले, ‘संयुक्त अरब अमितरात आणि जगभरातील दिवाळी साजरी करणार्या सर्व लोकांना हार्दिक शुभेच्छा. दिव्यांचा हा पवित्र सण सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो आणि देव तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सदैव सुरक्षित ठेवो.’