वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
१. वाचकांत राष्ट्रप्रेम जागवणारी, त्यांना धर्मसंजीवनी देणारी आणि अध्यात्ममार्ग अनुसरणार्या जिज्ञासूंना दिशादर्शन करणारी सनातनची ग्रंथसंपदा !
सनातनचे ग्रंथ म्हणजे राष्ट्र, धर्म, साधना आदी विषयांवरील सर्वांगस्पर्शी ज्ञानभांडार ! ग्रंथांतील लिखाण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर वाचकांना राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कृतीशील बनवणारे अन् साधनेसाठी प्रवृत्त करणारे मार्गदर्शक (गाईड) आहे. देश-विदेशातील राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना त्यांच्या कार्यात दिशादर्शन घेण्यासाठी या ग्रंथांचाच आधार वाटतो. जिज्ञासूही साधनेच्या ओढीने या ग्रंथांकडे धाव घेतात. समाजाला धर्माचरणी बनवण्यात ग्रंथांचा मोलाचा वाटा आहे.
२. सर्व क्षेत्रांतील जिज्ञासूंची ज्ञानतृष्णा भागवणारी सनातनची सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदा !
ग्रंथांचे वैशिष्ट्य म्हणजे ही ग्रंथसंपदा सर्वांगस्पर्शी आहे. हिंदु धर्मतत्त्वज्ञान विशद करणारी, हिंदूंमध्ये धर्मजागृती करणारी, राष्ट्ररक्षण करण्यासाठी मार्गदर्शन करणारी, स्वभाषाभिमान वाढवणारी ग्रंथसंपदा सनातनने प्रकाशित केली आहे. त्याचप्रमाणे धार्मिक कृतींमागील शास्त्र सांगणारी, आचारधर्माचे पालन शिकवणारी, साधना करण्याचे महत्त्व बिंबवणारी, तसेच भावी पिढी धर्मनिष्ठ अन् राष्ट्रभक्त बनवणारी ‘बालसंस्कार’ या विषयांची ग्रंथमालिकाही उपलब्ध आहे. जिज्ञासूंना ज्या विषयात रस आहे, ते ज्ञान ग्रंथवाचनाने त्यांना निश्चितच मिळेल, यात शंका नाही !
३. दीपावलीनिमित्त सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ इतरांना भेट स्वरूपात द्यावेत !
दीपावलीनिमित्त बरेच जण आपले आप्तेष्ट, परिचित, स्नेही आदींना भेटवस्तू देतात, तर काही व्यावसायिक ग्राहक आणि कर्मचारी यांना भेट देतात. अनमोल विचारधन असलेली सनातनची ग्रंथसंपदा इतरांना भेट म्हणून दिल्यास त्या माध्यमातून देणार्यांची धर्मसेवा होईल आणि ग्रंथ सर्वदूर पोचतील. ‘या धर्मसेवेत कशा प्रकारे सहभागी होऊ शकतो ?’, ते पुढे दिले आहे.
अ. भाऊ बहिणीला भाऊबिजेनिमित्त ओवाळणी देतो. ‘सनातनचे ग्रंथ किंवा लघुग्रंथ’, ही वैशिष्ट्यपूर्ण ओवाळणी ठरेल.
आ. सुवर्णकार दीपावलीच्या काळात सोने खरेदी करणार्या ग्राहकांना भेटवस्तू देतात. सनातनचे अलंकाराविषयीचे ग्रंथ आणि लघुग्रंथ ग्राहकांना भेट देऊन या कार्यात खारीचा वाटा उचलण्याची सुवर्णकारांना संधी आहे.
इ. ‘शॉपिंग मॉल्स’, ‘सुपर बझार’, वस्त्रदालने, मिठाई भांडार (स्वीट मार्ट) आदींचे मालक या काळात ग्राहकांना भेटवस्तू देतात. ग्रंथ आणि लघुग्रंथ यांचे आकर्षक संच बनवून ते ग्राहकांना देऊ शकतो.
ई. व्यवसाय करणारे हितचिंतक आपल्या सहकार्यांना, तसेच आस्थापनातील कर्मचार्यांना दीपावलीनिमित्त भेट स्वरूपात ग्रंथ आणि लघुग्रंथ देऊन त्या माध्यमातून राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्यात सहभागी होऊ शकतात.
इतरांची रूची समजून घेऊन त्यांना त्या विषयाचे ग्रंथ भेट दिल्यास ते अधिक परिणामकारक ठरेल.
इतरांना भेट स्वरूपात देण्यासाठी सनातनची उत्पादने आणि ‘सनातन पंचांग’ही उपलब्ध !
१. सनातनची सात्त्विक आणि दर्जेदार उत्पादने
सनातनने उदबत्ती, भीमसेनी कापूर, अष्टगंध, कुंकू, दंतमंजन, साबण, उटणे आदी नित्योपयोगी उत्पादनांची निर्मिती केली आहे. त्याचप्रमाणे गोमूत्र-अर्क, त्रिफळा चूर्ण आदी शुद्ध आयुर्वेदीय उत्पादनेही उपलब्ध केली आहेत.
‘अन्यांना ही उत्पादने देतांना सुलभ व्हावे’, यासाठी भेटसंचाचा वैशिष्ट्यपूर्ण खोका सिद्ध करण्यात आला आहे. त्यात सर्व उत्पादने आणि लघुग्रंथ आकर्षकरित्या मांडता येतात. उत्पादनांचे भेटसंच बनवून इतरांना भेट देऊ शकतो.
२. सनातनचे आकर्षक पंचांग
प्रतिवर्षीप्रमाणे संस्थेने ‘सनातन पंचांग’ प्रकाशित केले आहे. मराठी, हिंदी, कन्नड, गुजराती, इंग्रजी, तेलुगु आणि तमिळ या ७ भाषांत पंचांग उपलब्ध असून त्याचे अर्पणमूल्य ४५ रुपये आहे. पंचांगाच्या प्रत्येक पृष्ठावर आराध्यदेवतेची सात्त्विक चित्रे असल्याने पहाणार्याचे लक्ष लगेचच वेधले जाते. या पंचांगामध्ये साधना, अध्यात्म, धर्माचरणाच्या सोप्या कृती यांसह हिंदु राष्ट्राशी संबंधित दिशादर्शन करण्यात आले आहे. पुढील वर्षीचे (वर्ष २०२५ चे) पंचांग आता उपलब्ध झाले आहे. दीपावलीच्या काळात ते भेट देऊ शकता.
इतरांना भेट म्हणून देण्यासाठी सनातनचे ग्रंथ, उत्पादने आणि सनातन पंचांग यांची मागणी करायची असल्यास स्थानिक साधक अथवा नियतकालिकांचे वितरक यांच्याशी लवकरात लवकर संपर्क साधावा.