‘मी रुग्णाईत असल्याने सेवा करू शकत नव्हते. माझी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याशी एक आठवडा भेट झाली नव्हती.
१. स्वप्नात ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या माध्यमातून भगवतीदेवीचे दर्शन घ्यावे’, असे वाटणे आणि आश्रमात कार्यक्रम असल्याने त्या व्यस्त असणे
९.३.२०२३ या दिवशी रात्री मला स्वप्न पडले. मला स्वप्नात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भेटण्याची पुष्कळ इच्छा झाली. ‘त्यांच्या माध्यमातून भगवतीदेवीचे दर्शन घ्यावे’, असे वाटून मी भावस्थितीत रामनाथी आश्रमात आले. आश्रमात काहीतरी कार्यक्रम चालू होता. त्यामुळे श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ व्यस्त होत्या. मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत होते.
२. साधिका दिसल्यावर मनात ‘त्या देवीची विविध रूपे आहेत’, असा भाव दाटून येणे आणि त्यांचे दर्शन घेतांना देहभान विसरणे
तेवढ्यात मला काही साधिका दिसल्या. माझ्या मनात ‘त्या देवीची विविध रूपे आहेत आणि मी त्यांचे दर्शन घेत आहे’, असा भाव दाटून आला. माझ्या मनाच्या भावस्थितीत जसजशी वाढ होत होती, तसतसे त्या साधिकांच्या चेहर्यावर देवीस्वरूपाचे भाव आणि चैतन्य जागृत होत होते. त्या साधिकांमध्ये देवीमातेसारखा वात्सल्यभाव जागृत होऊन त्या माझ्याकडे कृपाळू दृष्टीने पहात होत्या. त्यांचे दर्शन घेतांना मी देहभान विसरले.
३. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ त्या साधिकांच्याच रूपात मला भेटल्या’, असे वाटून माझे मन शांत झाले.’
– सौ. स्वाती संदीप शिंदे (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.३.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |