स्वावलंबी आणि इतरांचा विचार करणारे देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नेताजी जाधव (वय ८४ वर्षे) !

‘देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. नेताजी जाधव (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ८४ वर्षे) यांची साधकाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. नेताजी जाधव

१. शिस्तप्रिय

‘श्री. जाधवआजोबा प्रतिदिन पहाटे ४ वाजता उठून स्वतःचा दिनक्रम चालू करतात.

श्री. रमेश सावंत

२. स्वावलंबी असणे

आजोबा स्वतःची कामे स्वतःच करतात. या उतारवयातही स्वतःचे कपडे स्वतःच धुतात.

३. इतरांचा विचार करणे

मी दुपारी आणि रात्री जाधवआजोबांना त्यांच्या खोलीत महाप्रसाद नेऊन देतो. तेव्हा आजोबा आधीच खोलीच्या दाराशी येऊन थांबतात. ‘माझा सेवेचा वेळ जायला नको’, असे त्यांना वाटते.

४. शिकण्याची वृत्ती असणे

आजोबांना भ्रमणभाषच्या संदर्भात काही अडचण आल्यावर ते मला विचारतात आणि त्यातील काही गोष्टी ते शिकून घेतात. ‘भ्रमणभाषमध्ये पुन्हा अशा प्रकारची अडचण आल्यास ते ती सोडवू शकतील’, असा त्यांचा त्यामागील दृष्टीकोन असतो.

‘श्री. नेताजी जाधवआजोबा यांचे गुण माझ्यातही येऊ देत’, अशी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना करतो.’

– श्री. रमेश सुरेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३१.७.२०२४)