‘१९.८.२०२४ या दिवशी मला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (सनातनच्या ४८ व्या संत, वय ९१ वर्षे) यांना भेटण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. ‘पू. दातेआजींच्या खोलीत पुष्कळ थंडावा, प्रकाश आणि चैतन्य आहे’, असे मला जाणवले.
२. पू. दातेआजींना बघून मला माझ्या आजीची (पू. (श्रीमती) कला प्रभुदेसाई, सनातनच्या ४९ व्या संत, वय ८८ वर्षे यांची) आठवण झाली.
३. पू. आजींची भेट झाल्यावर मला गुरुदेवांची भेट झाल्यासारखे वाटले.
४. माझ्यावरील मायेचा प्रभाव न्यून झाला आणि ‘साधना करणे’, हेच माझे ध्येय आहे’, याची मला जाणीव झाली.’
– कु. प्रियांका प्रभुदेसाई, ठाणे (२०.८.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |