‘सर्व हिंदुत्वनिष्ठांनी एकत्र येऊन एका व्यासपिठावर येणे, एक विचार घेणे आणि एकत्रित होऊन काम करणे आवश्यक आहे. जोपर्यंत आपण एकत्रित येऊन काम करणार नाही, तोपर्यंत आपली शक्ती नष्ट होत राहील. अनेक ठिकाणी आपण लहान लहान विहिरी खणत राहिलो, तर पाणी कुठेच लागणार नाही. एकाच ठिकाणी प्रयत्न केल्यास आपण खोलपर्यंत विहीर खणू शकतो आणि त्यामुळे सर्वांना मुबलक पाणी मिळेल. जे आपल्याला ऊर्जा आणि चेतना देत राहिल; म्हणून सर्वप्रथम आपला संकल्प असला पाहिजे. आपल्या सर्वांसाठी ‘सनातन संस्था’ हे फार मोठे व्यासपीठ आहे.
– पू. रामबालक दासजी महात्यागी महाराज