नोएडा (उत्तरप्रदेश) : येथील ‘ए-वन’ ढाब्यामध्ये रोटी बनवतांना त्यात थुंकणार्या चांद नावाच्या धर्मांधाला पोलिसांनी अटक केली. चांद हा ढाब्यामध्ये स्वयंपाकी म्हणून कामाला होता. चांद याच्या किळसवाण्या कृत्याचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी ७ सप्टेंबरला त्याला बेड्या ठोकल्या.
या प्रकरणाची माहिती देतांना पोलीस उपनिरीक्षक हरेंद्र कुमार म्हणाले की, सामाजिक संकेतस्थळावर रबुपुरा मार्केटमधील ‘ए-वन’ ढाब्यातील प्रसारित झालेला व्हिडिओ पोलिसांच्या पहाण्यात आला. हा व्हिडिओ शुक्रवार, ६ सप्टेंबरला रात्री ८.३० वाजता बनवण्यात आला होता. यामध्ये चांद हा रोट्या बनवतांना त्यांच्यावर थुंकत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई केली.
संपादकीय भूमिका
|