(पास्टर म्हणजे ख्रिस्ती धर्मप्रचारक)
सीतापूर (उत्तरप्रदेश) : प्रार्थना सभेच्या नावाखाली हिंदूंना एकत्र करून त्यांना आमीष दाखवून त्यांचे हिंदूंचे धर्मांतर करणारा पास्टर संजीव कुमार याला सीतापूर पोलिसांनी कह्यात घेतले. ७ सप्टेंबर या दिवशी ही घटना घडली.
हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी पास्टर संजीव ‘कॅलेसिया’ नावाच्या सभेचे आयोजन करून हिंदूंना बोलावत होता. अशाच एका सभेत हिंदु संघटनांचे कार्यकर्ते पोचले आणि त्यांनी हा प्रकार उघड केला. यानंतर राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल गुप्ता यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. या तक्रारीत राहुल गुप्ता यांनी म्हटले आहे, ‘‘देवरिया खुर्द गावात संजीव कुमार नावाचा एक धर्मांतरित ख्रिस्ती हिंदूंचे धर्मांतर करत असल्याची मला मिळाली. माहिती योग्य असल्याचे आढळून आल्यानंतर आम्ही त्याच्या सभेत गेलो आणि हा प्रकार उघड केला.’’ घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी संजीव याला कह्यात घेतले. संजीव याच्या घराच्या भिंतींवर येशू ख्रिस्ताची चित्रे आहेत.
संपादकीय भूमिका
|