भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करावे ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेशमधील वाराणसी, पिंडरा, सैदपूर आणि बिहार येथील पाटलीपुत्र येथे सरकारला निवेदन सादर

सैदपूर (उत्तरप्रदेश) येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी

वाराणसी (उत्तरप्रदेश) – बांगलादेशात आरक्षणाच्या सूत्रावर आंदोलन चालू झाले होते; मात्र त्यानंतर धर्मांध आंदोलक जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करत आहेत. त्यांच्या घरांवर आक्रमण करणे, बलात्कार करणे, त्यांची दुकाने लुटणे, तोडफोड करणे, मंदिरे जाळणे, असे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे अल्पसंख्यांक हिंदु समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात बांगलादेशाच्या सैन्याने हिंदूंच्या सुरक्षेची हमी दिली असली, तरी भारत सरकारने त्यावर अवलंबून न रहाता हिंदु समाज आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठांनी सरकारकडे एका निवेदनाद्वारे केली. उत्तरप्रदेशातील वाराणसी, पिंडरा, सैदपूर आणि बिहार येथील पाटलीपुत्र येथे सरकारला जिल्हाधिकार्‍यांकडे हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठांनी निवेदन सादर केले. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन यात स्वतःहून लक्ष घालून कारवाई का करत नाही ? – संपादक)