प्रपंचाची आणि जगाची आस सोडून भगवंताचे दास झाल्याविना समाधान मिळणे कठीण आहे. हे दास्यत्व येण्यासाठी भगवंताच्या प्राप्तीची उत्कंठा आणि निर्दोषपण आम्हाला लागणे जरूर आहे. आपण खरोखरच जसे नाही तसे जगाला दिसू नये. मनाने नेहमी शुद्ध असावे. ‘आपण खरोखर चांगले नाही’, असे आपल्याला कळत असतांनासुद्धा लोक आपल्याला चांगले म्हणतात, याची आम्हाला खंत वाटणे जरूरीचे आहे. आचारविचाराने इतके पवित्र झाल्यानंतर मग आम्हाला भगवंताचे का बरे होता येणार नाही ?
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(साभार : ‘पू. प्रा. के.व्ही. बेलसरे-आध्यात्मिक साहित्य’ फेसबुक)