कोटा (राजस्थान) येथील दर्ग्यात मांसाहार करून त्याची भांडी मंदिराबाहेर धुण्यावर आक्षेप घेतल्याने घडली घटना !
कोटा (राजस्थान) – मंदिराबाहेर मांसाहार असलेली भांडी धूत असतांना आक्षेप घेतला म्हणून मोतीपुरा गावातील प्राचीन श्रीनाथजी चरण चौकी मंदिरात १५ ऑगस्टच्या रात्री धर्मांध मुसलमानांनी घुसून पुजार्याला ठार मारण्याची आणि मंदिर बाँबने उडवून देण्याची धमकी दिली. (जर हिंदूंनी चुकून मशिदीमध्ये घुसून असा प्रकार केला असता, तर संपूर्ण देशात आगडोंब उसळला असता ! – संपादक)
A fanatic group of Mu$|!ms threatens to kill the temple priest and blow up the ancient temple with a bomb !
📍Shrinath Ji Charan Chowki, Kota (Rajasthan)
The incident occurred because of objections raised when utensils used for eating meat in the dargah were washed outside the… pic.twitter.com/698hdKGEdV
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 18, 2024
१. श्रीनाथ चरण चौकी मंदिराचे पुजारी सोहन लाल यांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १५ ऑगस्टच्या संध्याकाळी मंदिराजवळील एका दर्ग्यात मुसलमान मांसाहार करत होते आणि मंदिराजवळील मांसासाठी वापरलेली भांडी धूत होते. त्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली होती. मी, त्रिलोक, तुलसी आणि जितेंद्र यांनी भांडी धुण्यावर हरकत घेतली. यावर मुसलमानांतील २० ते ३० लोकांनी चाकू घेऊन मंदिरात घुसून शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. मंदिराचा दरवाजा आतून बंद करून आम्ही आमचे प्राण वाचवले. मंदिरात घुसलेल्या मुसलमानांनी मंदिर बाँबने उडवून देण्याची धमकी दिली.
२. या प्रकरणी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयात निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
३. येथील पोलीस उपायुक्तांनी सांगितले की, भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम २९८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या सर्वांना पकडण्यासाठी धाडी घालण्यात येत आहेत.
संपादकीय भूमिका
|