कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्ण एस्. दीक्षित यांची स्पष्टोक्ती !
बेंगळुरू (कर्नाटक) – वर्ण म्हणजे जाती नव्हेत. मनू ब्राह्मण नव्हता. मनु ही एक पदवी आहे. मनुस्मृतीमध्ये अनेक उच्च तत्त्वे समाविष्ट आहेत. भारताचे महाकाव्य, वेद आणि उपनिषद हे बहुतेक शूद्र वर्णाच्या लोकांनीच रचले आहेत, असे विधान कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्ण एस्. दीक्षित यांनी केले. ते कर्नाटक उच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता व्ही. तारकराम यांच्या स्मरणार्थ आयोजित ‘कायदा आणि धर्म’ या विषयावर बोलत होते. या वेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिवक्ते, तसेच राज्य अधिवक्ता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
𝐕𝐚𝐫𝐧𝐚 𝐚𝐧𝐝 𝐂𝐚𝐬𝐭𝐞 𝐝𝐨 𝐧𝐨𝐭 𝐦𝐞𝐚𝐧 𝐭𝐡𝐞 𝐬𝐚𝐦𝐞 𝐭𝐡𝐢𝐧𝐠
Karnataka High Court Judge Krishna S Dixit
Hinduism has always had a greater influence than all other religions in the world in establishing laws.
Read more : https://t.co/4wkJhv9j3a pic.twitter.com/Vv8RvQOgpp
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 16, 2024
न्यायमूर्ती दीक्षित पुढे म्हणाले की,
१. खड्ग संस्कारामुळे युद्ध कौशल्य आत्मसात केल्याने शूद्र वर्णीय पुढे राजे बनले. कायदे सिद्ध करण्यात विश्वातील इतर सर्व धर्मांपेक्षा हिंदु धर्माचा नेहमीच मोठा प्रभाव आहे.
२, सर्व देशांमधील कायदे हे स्थानिक नियम, प्रथा आणि पूर्वानुभव यांच्या आधारावर बनले आहेत. भेदभाव नसलेली व्यवस्था म्हणजे धर्म आहे.
३. सर्व धर्मांमध्ये कर्मठ व्यक्ती असतात. त्यांची संख्या अधिक किंवा अल्प असते. धर्मामध्ये भावनिक घटक असतो; म्हणूनच कार्ल मार्क्स यांनी धर्माला ‘अफू’ असे म्हटले. तरीही कोणताही धर्म टीकेपासून मुक्त नाही.
४. युद्ध आरंभ होण्यापूर्वी युद्धाचे नियम बनवले गेले होते, हे महाभारतात पहायला मिळतात; परंतु ‘युद्ध आणि प्रेम यांमध्ये सर्व काही योग्य मानले जाते’, असे तत्त्व युरोपचे आहे.