मुंबई – के.ई.एम्. रुग्णालयात गुडघारोपण शस्त्रक्रियेसाठी आणण्यात आलेल्या रोबोटद्वारे मागील ५ महिन्यांत १०१ रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून रुग्णांनाही अल्पावधीत रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
देशामध्ये रोबोटद्वारे शस्त्रक्रिया करणारे के.ई.एम्. रुग्णालय हे पहिले सरकारी रुग्णालय ठरले आहे. मार्च २०२४ मध्ये रोबोटच्या माध्यमातून प्रथम यशस्वी गुडघा रोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.
के.ई.एम्. रुग्णालयाच्या अस्थिव्यंग विभागामध्ये रोबोट आणण्याचा प्रस्ताव २०१६ मध्ये मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता; मात्र कोरोना माहामारीमुळे रोबोट आणण्याच्या संदर्भातील प्रक्रिया ठप्प झाली होती.