जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठाचा हिंदुद्वेष !

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठ

१. हिंदु कर्मचार्‍यावर धर्मांतर करण्यासाठी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठातील वरिष्ठांचा दबाव

‘वर्ष १९८८ मध्ये जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठ हे ‘अल्पसंख्यांक शिक्षण संस्था’ असल्याचे घोषित करण्यात आले. या विद्यापिठातील एक धक्कादायक बातमी नुकतीच समोर आली. या विद्यापिठात रामनिवास सिंह हे कारकून म्हणून कार्यरत आहेत. तेथे बढतीचे पद रिक्त होते आणि ते त्या पदासाठी पात्र होते. विद्यापिठातील प्राध्यापक नजीम हुसेन अल जाफरी यांनी या बढतीसाठी त्यांना धर्मांतर करण्यास सांगितले, असा आरोप रामनिवास सिंह यांनी केला. याविषयी सिंह यांनी प्राध्यापक नजीम हुसेन अल जाफरी यांच्या विरुद्ध लिखित तक्रार दिली, ‘मुसलमान धर्मात धर्मांतर केल्यास त्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यात येतील, तसेच त्यांना कायमस्वरूपी नोकरी आणि बढती देऊन त्यांच्या मुलांचे भवितव्य सुखकारक करतील, असे जाफरी यांनी त्यांना प्रलोभन दिले.’ जाफरी हे विद्यापिठात प्रबंधक म्हणून काम करतात. त्यांच्यासह नसीम हैदर आणि शहीद तसलीम या दोघांनीही हिंदु व्यक्तीवर धर्मांतरित होण्यासाठी दबाव निर्माण केला. या संदर्भातील ध्वनीचित्रफीत सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली आहे.

२. जातीवाचक शिवीगाळ आणि खोटा विनयभंग यांच्या तक्रारीत फसवण्याची धमकी

या प्रकरणी रामनिवास सिंह यांनी १५ जुलै २०२४ या दिवशी दक्षिण पूर्व देहलीतील जामियानगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आणि त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला. त्यानुसार जाफरी हे रामनिवास यांना जातीच्या आधारे अपमानित करत असत. वर्ष २००७ मध्ये सिंह यांची अनुसूचित जातीच्या प्रवर्गात नेमणूक झाली होती; परंतु त्यांना आरक्षणाचे लाभ देण्याऐवजी बलपूर्वक मुसलमान धर्म स्वीकारण्यास दबाव टाकण्यात आला. सिंह यांनी धर्मांधांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यापूर्वी ‘राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगा’कडे तक्रार केली होती. या आयोगाला घटनात्मक दर्जा आहे. या तक्रारीची नोंद घेऊन अन्वेषण करण्याचा आदेश झाला; मात्र धर्मांधांनी पीडित दलित व्यक्तीला धमकावले आणि जातीवाचक शिवीगाळ करून खोट्या विनयभंगाच्या तक्रारीत फसवण्याची धमकी दिली.

३. हिंदु विद्यार्थ्यांवर मुसलमान पंथानुसार आचरण करण्याची बळजोरी 

या विद्यापिठातील एका माजी विद्यार्थ्याने नाव घोषित न करण्याच्या अटीवर सांगितले, ‘तो या विद्यापिठात शिकत होता. या ठिकाणी आधीपासून हिंदु मुलांना लक्ष्य करण्यात येते. त्यांनी दिवाळी किंवा होळी अशा सणांमध्ये भाग घेतल्यास त्यांचा छळ करण्यात येतो. यासमवेतच कुराणातील कलमा वाचण्यासाठी आणि इस्लामनुसार आचरण करण्यासाठी बळजोरी करण्यात येते.’ या संदर्भातील बातमी आणि लेख ‘ऑर्गनायझर’ या वृत्तसंस्थेत प्रसिद्ध झाला आहे.

४. अनुसूचित जाती-जमातीसाठी असलेली २४० हून अधिक राखीव पदे रिक्त 

या विद्यापिठात अनुसूचित जातीजमातीसाठी असलेली राखीव पदे रहित केली आहेत. याविषयी ओरड झाल्यानंतर सध्या २४० हून अधिक पदे रिक्त असल्याचे सांगण्यात आले. या विद्यापिठात अनुसूचित जातीजमातीसाठी असलेल्या आरक्षित जागाही भरलेल्या नाहीत. त्यासाठी पीडित व्यक्तीने देहली उच्च न्यायालयात रिट याचिका प्रविष्ट केली आहे. यावर देहली उच्च न्यायालयाने अनुसूचित जातीसाठी एक उपप्रबंधकाची जागा रिक्त ठेवण्याचा आदेश दिला आहे. यासमवेतच धर्मांध प्रबंधकाने जो सिंह यांना त्रास दिला आणि त्यांचा वैयक्तिक रेकॉर्ड वाईट करण्याचा प्रयत्न केला, त्याविषयी विद्यापिठाचे म्हणणे मागवले आहे.

५. केंद्रासह अनेक राज्यांत हिंदुत्वनिष्ठ सरकारे असतांनाही हिंदूंचे धर्मांतर थांबेना !

भारतभर धर्मांध मुसलमान आणि ख्रिस्ती हे हिंदूंचे धर्मांतर करण्यात अग्रेसर आहेत. देशात गेल्या १० वर्षांहून अधिक काळ हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांनाही धर्मांतराच्या कारवाया थोड्याही थांबल्या नाहीत. याविषयी विविध उच्च न्यायालयांनी अनेकदा सरकारला जाणीव करून दिली आहे, तसेच त्यांच्या निकालपत्रात केंद्र आणि राज्य सरकार यांना कारवाई करण्याविषयी सूचितही केले आहे; परंतु बळजोरीने मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे धर्मांतर होत आहे. या थांबवण्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन आणि त्याहून हिंदु राष्ट्राची निर्मिती हाच यांवरील एकमात्र उपाय आहे.’ (२३.७.२०२४)

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय


उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंचे धर्मांतर करण्याचा ख्रिस्त्यांचा डाव अयशस्वी !

१३.७.२०२४ या दिवशी उत्तरप्रदेशातील मुरादाबादमध्ये अनधिकृतपणे ख्रिस्ती धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असतांना एका पाद्रीसह ४ व्यक्तींना अटक झाली. त्यांच्यावर पोलिसांनी ‘भारतीय न्याय संहिते’च्या कलम ३५१ (२) आणि (३) प्रमाणे अन् ‘उत्तरप्रदेश बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधित कायदा २०२१’ यांनुसार गुन्हा नोंदवला. हा गुन्हा ठाकूरद्वार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला. याविषयी माहिती देतांना पोलीस अधिकारी राजेश कुमार म्हणाले, ‘‘ख्रिस्त्यांची एक सभा आयोजित करण्यात आली होती. यात प्रलोभने देऊन भोळ्याभाबड्या हिंदूंना धर्मांतरित करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप करत विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी पोलीस तक्रार केली. त्यामुळे गुन्हा नाेंदवण्यात आला. ख्रिस्ती जयपाल, अमरजीत आणि मुकेश या लोकांनी अशा प्रकारचे मेळावे आयोजित केलेले होते. त्यात १५ कुटुंबातील अनुमाने ६० व्यक्तींचे धर्मांतर करण्याचा त्यांचा डाव होता. पोलीस तक्रारीनुसार धर्मांतर करण्यासाठी भोळ्याभाबड्या हिंदूंना फ्रिज, भ्रमणभाषसंच, सायकली, मोटरसायकली, शिलाई मशीन आदी देण्याचे प्रलोभन दाखवण्यात आले. यासमवेतच त्यांना नियमितपणे दरमहा २५ सहस्र रुपये दिले जातील, असेही सांगण्यात आले.

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी