बेलापूर रेल्वेस्थानकातील धक्कादायक घटना !
नवी मुंबई – बेलापूर रेल्वेस्थानकात लोकलगाडी पकडत असतांना एक महिला रुळावर पडल्यामुळे तिच्या अंगावरून लोकल गेली. तिचा जीव वाचला; पण तिला दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. पुष्कळ गर्दी असल्याने महिलेचा पाय घसरला आणि ती रुळांवर पडली. त्यातच तिच्या अंगावरून रेल्वेचा पहिला डबा गेला. रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासन यांनी काही वेळातच लोकल मागे घेतली. तिला बाहेर काढले असून तिच्यावर पुढील उपचार चालू आहेत.