Bangladesh Rohingya Muslims : प्रतिमास २०० हून अधिक रोहिंग्या मुसलमानांची भारतात घुसखोरी !

  • १४ राज्यांमध्ये कायमस्वरूपी वास्तव्य !

  • वर्ष २०१७ पर्यंत ४० सहस्र रोहिंग्यांनी केली होती घुसखोरी !

नवी देहली – देशात अवैधरित्या स्थायिक झालेल्या लाखो रोहिंग्या घुसखोर मुसलमानांना परत पाठवण्यासाठी भारत शासन प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे. वर्ष २०१७ पर्यंत घुसखोरांची संख्या ४० सहस्र होती. वर्ष २०१२ ते २०१७ या कालावधीत ती अनेक पटींनी वाढली. आता नवीन माहिती समोर आली असून प्रतिमास २०० हून अधिक रोहिंग्या मुसलमानांनी बांगलादेशातून भारतात घुसखोरी केली आहे.

हे घुसखोर आसाम, बंगाल, त्रिपुरा, मिझोराम, मेघालय, जम्मू-काश्मीर, हरियाणा, पंजाब, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ ही १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश येथे कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत. हे सर्व काम आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी करणार्‍या टोळ्या करतात.

रोहिंग्या मुसलमानांसंदर्भात धक्कादायक गोष्टी उघड !

अलीकडेच राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने मानवी तस्करी टोळीचा प्रमुख जलील मियां याला अटक केली होती. त्याच्या चौकशीत पुढील धक्कादायक गोष्टी समोर आल्या.

१. जलील मियां हा त्रिपुराचा रहिवासी आहे. त्याचे सहकारी मियां आणि शांतो, हे अद्याप फरार आहेत.

२. पोलिसांनी मियांच्या केलेल्या चौकशीनंतर त्याच्या गटातील २९ जणांना अटक करण्यात आली.

३. भारतात स्थायिक होऊ इच्छिणार्‍या रोहिंग्या मुसलमानांना १० ते २० लाख रुपये (१४ ते २८ लाख बांगलादेशी टका) दिले जातात, तसेच त्यांना सीमेपलीकडून बनावट भारतीय ओळखपत्राद्वारे भारतात आणले जाते.

४. अशांना भारतीय उच्चारांसह हिंदी बोलण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांना आसामी, तसेच इतर भारतीय भाषांमध्ये संवाद साधण्याचेही प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून रोहिंग्या घुसखोर भारतात आल्यावर त्यांच्या उच्चारावरून ते ओळखले जाऊ नयेत.

५. प्रतिदिन ५ ते १० रोहिंग्या भूमीगत बोगद्यातून भारतात घुसखोरी करतात. यासाठी आसाम, मिझोराम, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांच्या आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या भागांमध्ये भूमीगत बोगदे खोदण्यात आले आहेत.

६. भारतात घुसखोरी केल्यानंतर राजधानी देहली हे रोहिंग्यांचे  मुख्य ठिकाण आहे. देहलीतील जसोला, यमुना नदीचा काठ, श्रम विहार, कांचन विहार आणि मदनपूर खादर, या ठिकाणी रोहिंग्या मोठ्या प्रमाणात अवैध वास्तव्य करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • म्यानमार आणि चीन हे देश मुसलमानांना कशा प्रकारची वागणूक देतात ?, हे जगजाहीर आहे. भारतानेही या घुसखोरांच्या मुसक्या आवळून त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवले पाहिजे, अन्यथा भारताचे ‘इस्लामीस्तान’ होण्याचा दिवस दूर नाही !
  • केंद्र सरकारने आता तरी प्राधान्याने देशभर ‘राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी’ (‘एन्.आर्.सी.’) प्रक्रिया राबवून सर्व रोहिंग्या, तसेच बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे !