May Elin Steiner Yoga : योग ही भारताने जगाला दिलेली सर्वांत मोठी देणगी !

नॉर्वेच्या भारतातील राजदूत मे एलिन स्टेनर यांचे विधान !

मे एलिन स्टेनर

नवी देहली – योग ही भारताने जगाला दिलेली सर्वांत मोठी देणगी आहे, असे विधान नॉर्वेच्या भारतातील राजदूत मे एलिन स्टेनर यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ‘एक्स’वर एक ‘पोस्ट’ प्रसारित करून ‘योग हा जीवनाचा अविभाज्य भाग बनवा’, असे आवाहन केले होते.

पंतप्रधानांच्या या ‘पोस्ट’ला उत्तर देतांना राजदूत स्टेनर म्हणाल्या, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पूर्णपणे सहमत आहे.’

२७ सप्टेंबर २०१४ या दिवशी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा जागतिक योगदिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर ११ डिसेंबर २०१४ या दिवशी १३० देशांनी या प्रस्तावाला मान्यता दिली.