वाराणसी आश्रमाचे सूक्ष्म परीक्षण ऐकल्यानंतर आश्रमातील साधकांना जाणवलेली सूत्रे

२१.८.२०२३ या दिवशी वाराणसी येथील आश्रमाची छायाचित्रे काढली होती आणि ३०.८.२०२३ या दिवशी सनातनचे सूक्ष्मज्ञान प्राप्तकर्ते श्री. राम होनप यांनी ती छायाचित्रे पाहून आश्रमाचे सूक्ष्म परीक्षण केले. त्यानंतर सत्संगात ही छायाचित्रे दाखवली आणि आश्रमाचे सूक्ष्म परीक्षण वाचून दाखवले. तेव्हा आश्रमातील साधकांना आश्रमाची छायाचित्रे पाहून आणि सूक्ष्म परीक्षण ऐकून जाणवलेली सूत्रे खाली दिली आहेत. २४.५.२०२४ या दिवशी यातील काही सूत्रे पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहू.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लीक करा : https://sanatanprabhat.org/marathi/796637.html 

वाराणसी येथील सनातनचा आश्रम

७. सौ. प्राची मसुरकर आणि श्री. दशरथ मसुरकर

अ. सूक्ष्म परीक्षण ऐकल्यानंतर मला पुष्कळ चैतन्य आणि आनंद मिळाला अन् गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटली. आश्रम पुष्कळ दिव्य आणि प्रकाशमान दिसत होता. आश्रम पाहून उत्साह वाढला. ‘ईश्वराची आमच्यावर किती कृपा आहे !’, याची मला जाणीव झाली.’

८. सुश्री सुनीता छत्तर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)

८ अ. वाराणसी आश्रमाचे सायंकाळचे छायाचित्र पाहिल्यावर

अ. वाराणसी आश्रमाच्या ध्यानमंदिरामधून लाल रंगाचा प्रकाश अधिक प्रमाणात प्रक्षेपित होत होता. तो पाहून शांत वाटत होते.

आ. ध्यानमंदिराच्या वरच्या भागातून निळा प्रकाश येतांना पाहून चैतन्य ग्रहण होत होते.

इ. त्या दिवशी ‘आकाश आणि आश्रम यांचा पांढरा रंग दोन्ही फिकट निळ्या रंगात एकरूप झाले आहेत’, असे दिसून आले. आकाशात फिकट गुलाबी रंगही दिसत होता.

ई. ध्यानमंदिराच्या बाहेर शीतलता अनुभवता येत होती.

उ. संपूर्ण आश्रम तीर्थक्षेत्रासमान पवित्र वाटत होता. मन शांत आणि स्थिर होऊन ‘निर्विचार होत आहे’, असे वाटले. ‘संपूर्ण आश्रमाकडे पहातच रहावे’, असे वाटत होते.

ऊ. आश्रम पहातांना ‘या आश्रमात रहाणारे जीव, म्हणजे साधक किती सौभाग्यशाली आणि पुण्यवान आहेत’, असा विचार येऊन साधकांप्रतीही मन सकारात्मक झाले.

ए. आश्रमाचे हे छायाचित्र पाहून ‘श्री हनुमान, माता जगदंबा, भगवान श्रीविष्णु, भगवान शिव आणि सर्व देवता या आश्रमात भरपूर प्रमाणात सकारात्मकता, प्रीती, शीतलता, शांती, स्थिरता, क्षात्रतेज अन् चैतन्य देत आहेत’, असे वाटले.’

९. श्रीमती सुमती सरोदे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)

९ अ. छायाचित्र पाहिल्यानंतर : ‘आश्रमाचे पहिले छायाचित्र पाहिल्यानंतर पुष्कळ शांत आणि स्थिर वाटले. आश्रमाचे दुसरे छायाचित्र पाहून ‘आश्रमातून अधिक प्रमाणात तेजतत्त्व प्रक्षेपित होत आहे’, असे वाटले.

९ आ. आश्रमाचे सूक्ष्म परीक्षण ऐकल्यानंतर : मला आश्रमात रहाण्याचे सौभाग्य मिळाले, यासाठी पुष्कळ कृतज्ञता वाटली. मी आश्रमाचा लाभ करून घेण्यात अल्प पडत आहे, माझ्यासारख्या अज्ञानी जिवाची साधना व्हावी; म्हणून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी आश्रम दिला आहे’, असे वाटले. यापुढे कृतज्ञताभावात राहून साधनेचे प्रयत्न वाढवीन.’

१०. श्री. राजाराम पाध्ये (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)

१० अ. आश्रमाची छायाचित्रे पाहून : ‘पहिले छायाचित्र पाहिल्यानंतर काही क्षणांतच माझ्या श्वासाची गती सावकाश झाली आणि मला चांगले वाटू लागले. दुसरे छायाचित्र पाहिल्यानंतर माझ्या सहस्रारचक्रावर चांगली स्पंदने अनुभवता आली आणि मन एकाग्र अन् प्रसन्न झाले. छायाचित्राच्या तुलनेत माझे लक्ष सहस्रारचक्रावरून अनुभवता येणार्‍या स्पंदनांवर अधिक होते.

१० आ. आश्रमाचे सूक्ष्म परीक्षण ऐकल्यावर

१. ‘सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी एक विशेष सत्संग आयोजित करून सर्व साधकांना रामनाथीहून आलेले आश्रमाचे सूक्ष्म परीक्षण सांगितले. ते ऐकून साधकांचा आश्रमाप्रतीचा भाव अधिक वाढला.

२. आश्रमाची एवढी वैशिष्ट्ये लक्षात आल्यानंतर आश्रमाचे पावित्र्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने ‘तेथील स्वच्छता करणे आणि साधनेच्या दृष्टीने प्रयत्न करणे, यांत आम्ही न्यून पडत आहोत अन् आम्हाला आणखी किती प्रयत्न वाढवले पाहिजेत’, याचीही जाणीव झाली, तसेच आमच्या अल्प प्रयत्नांविषयी मनात खंत निर्माण झाली.’

११. कु. सुमन सिंह (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के)

११ अ. आश्रमात आल्यानंतर त्वरित थकवा दूर होऊन मनाची नकारात्मकता अल्प होणे

१. वाराणसी आश्रमाचे सूक्ष्म परीक्षण ऐकल्यानंतर आश्रमाचे महत्त्व लक्षात आले. आम्ही आश्रमाची स्वच्छता करतो; परंतु आश्रम आम्हाला अंतर्बाह्य दोन्ही प्रकारे स्वच्छ करत आहे.

२. आम्हाला बाहेर जाऊन कुठेही सेवा करून आल्यानंतर थकवा येतो; परंतु आश्रमात आल्यानंतर आमचा थकवा त्वरित दूर होतो.

३. आश्रमात मनातील नकारात्मक विचार अल्प होतात.

४. सूक्ष्म परीक्षण ऐकल्यानंतर ‘आमच्या प्रतिक्रिया किंवा स्वभावदोष यांच्यामुळे आश्रमात नकारात्मक स्पंदने निर्माण होतात. त्या स्पंदनांचा कोणताही प्रभाव गुरुदेव आणि देवता यांच्यामुळे आश्रमावर होत नाही’, यासाठी कृतज्ञता वाटली.

१२. सौ. श्रेया प्रभु (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के)

१२ अ. सूक्ष्म परीक्षण ऐकल्यानंतर

१. ‘परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

२. ‘साधनेच्या दृष्टीने मी सर्वच ठिकाणी अल्प पडते आणि आश्रमाप्रती माझा भावही अल्प पडतो’, याची जाणीव होऊन मला खंतही वाटत होती.

३. सद्गुरु नीलेशदादा सतत आम्हाला सांगत असतात की, ‘आश्रम म्हणजे चार भिंती नसून ती आश्रमदेवता आहे.’ त्यांच्या या वचनाचे स्मरण होऊन कृतज्ञता वाटत होती.

४. सद्गुरु नीलेशदादा सद्गुरुपदावर विराजमान झाल्यानंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी आम्हाला सांगितले होते, ‘‘आश्रमात एखाद्या सद्गुरूंचे वास्तव्य असते, तर त्यांच्या अस्तित्वाने कशा प्रकारे पालट होतात, हे तुम्हाला आता अनुभवायला मिळेल.’’ त्यांच्या या वचनाचे स्मरण होऊन त्याची प्रचीती आली आणि माझी भावजागृती झाली.’

परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला या दैवी आश्रमात रहाण्याची संधी दिली, यासाठी आम्ही सर्व साधक त्यांच्या चरणी कृतज्ञ आहोत.’

(वरील सर्व सूत्रांसाठी दिनांक १५.११.२०२३)

(समाप्त)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक