साधकाने अभिलाषा धरू नये !

‘साधकाने निरभिलाष असावे. त्याने कशाचीही, विशेषकरून दुसर्‍याच्या वस्तूची अभिलाषा धरू नये. याचा अर्थ ‘वस्तूपासून मिळणारा भौतिक आनंद त्याने घेऊ नये’, असा नाही. अवश्य घ्यावा; परंतु नैतिकदृष्ट्या जी वस्तू माझी असेल, तिचाच आनंद घ्यावा. दुसर्‍याची वस्तू घेणे, ही चोरी आहे. चोरी अध्यात्मदृष्ट्या महापाप होय. कुठल्याही पापापासून साधकाने सावधपणे दूर राहिले पाहिजे.’

– स्वामी विद्यानंद (साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)