पुणे येथे गांजा बाळगल्याप्रकरणी ६ जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – ८६५ किलो गांजा बाळगणे आणि त्याची वाहतूक केल्याप्रकरणी ६ जणांची ४ वर्षांनंतर सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. खेड येथील विशेष न्यायाधीश ए. एस्. सय्यद यांनी हा निकाल घोषित केला. १९ मे २०१९ या दिवशी खेड तालुक्यातील बेल्हे येथे ही कारवाई करण्यात आली होती. या ६ जणांवर अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंद केला होता. या कायद्यातील प्रावधानांची पूर्तता न केल्याने ६ जणांची मुक्तता करण्यात आली.

संपादकीय भूमिका :

  • सबळ पुरावे सादर न करणे यात पोलिसांची निष्क्रीयता दिसून येते !
  • अमली पदार्थांनी राज्याची वाताहत होत असतांना पोलीस पुरावे सादर करू न शकणे आणि आरोपी सुटणे हे यंत्रणेला लज्जास्पद !