|
वॉशिंग्टन (अमेरिका) : काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील बाल्टिमोर येथे ‘डाली’ नावाच्या मालवाहू नौकेच्या धडकेने ‘फ्रान्सिस स्कॉट की’ पूल कोसळला. या अपघातात ६ जणांना जीव गमवावा लागला. असे असले, तरी नौकेवरील उपस्थित भारतीय कर्मचार्यांच्या सतर्कतेमुळे अनेकांचे प्राण वाचले. याविषयी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह अनेक जणांनी कर्मचार्यांचे कौतुकही केले; मात्र आता ‘फॉक्सफोर्ड कॉमिक्स’ने यावर एक वर्णद्वेषी व्यंगचित्र काढून भारतियांचा अवमान केला आहे. या व्यंगचित्रावरून सामाजिक माध्यमांतून टीका होत आहे.
Last known recording from inside the Dali moments before impact pic.twitter.com/Z1vkc828TY
— Foxford Comics (@FoxfordComics) March 26, 2024
काय आहे व्यंगचित्रात ?या व्यंगचित्राचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्यात आला आहे. यात केवळ लुंगी नेसलेले घाबरलेले पुरुष दाखवले आहेत. या व्हिडिओत म्हटले आहे, ‘डाली नौकेतील अंतिम क्षणाचे चित्रण.’ नौका चालवणारे गांवढळ भारतीय होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला, असे यातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. |
संपादकीय भूमिकाअमेरिकेतील समाजात वर्णद्वेष किती मोठ्या प्रमाणात झिरपला आहे, हेच यातून दिसून येते. वर्णद्वेष ही तेथील मोठी सामाजिक समस्या असून ती अल्प करण्याऐवजी अमेरिका मात्र भारताच्या अंतर्गत गोष्टींत नाक खुपसते ! अशा अमेरिकेला तिची जागा दाखवण्यासाठी भारताने अधिक आक्रमक होणे आवश्यक ! |