Pakistan Ishaq Dar : चीन पाकचा ‘एक प्रकारे शेजारी देश’ ! – पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून अप्रत्यक्षरित्या पाकव्याप्त काश्मीर पाकचा भाग नसल्याचीही स्वीकृती !

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी पाकिस्तानने बलपूर्वक पाकव्याप्त काश्मीरवर नियंत्रण मिळवले असल्याचे सत्य लंडन येथील पत्रकार परिषदेत अप्रत्यक्षरित्या स्वीकारले. यावरून आता पाकमध्ये चर्चा होऊ लागली आहे. डार यांनी पत्रकार परिषदेत भारत, इराण आणि अफगाणिस्तान यांचे पाकचा शेजारी देश म्हणून वर्णन केले आणि चीन ‘एक प्रकारचा शेजारी देश’ असे वर्णन केले. याच परिषदेमध्ये इशाक डार यांनी भारताशी व्यापारी संबंध पूर्ववत् करण्यावर भर दिला होता.

पाकिस्तान चीनला त्याचा सर्वांत जवळचा शेजारी मित्र मानतो; पण पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असलेल्या दोन्ही देशांना जोडतो. जर पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारताशी जोडला गेला, तर चीन हा पाकिस्तानचा शेजारी देश रहाणार नाही.