Karnataka BJP MLA Arrested : कर्नाटकातील भाजपचे आमदार सी.टी. रवि यांना अटक !

  • महिला मंत्र्याला विधान परिषदेत ‘वेश्या’ म्हटल्याचा आरोप !

  • रवि यांनी आरोप फेटाळत ‘कारागृहात बरेवाईट झाले, तर काँग्रेस आणि पोलीस उत्तरदायी असतील’, अशी लेखी तक्रार

भाजप नेते सी.टी. रवी यांना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अटक

बेंगळुरू (कर्नाटक) : कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमधील महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना विधान परिषदेतील कामकाजाच्या वेळी ‘वेश्या’ संबोधल्याच्या आरोपावरून भाजपचे विधान परिषदेतील आमदार सी.टी. रवि यांना पोलिसांनी अटक केली आहे. रवि यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळला आहे. ते म्हणाले की, महिला मंत्र्यासाठी असे शब्द त्यांनी कधी वापरलेच नाहीत.

रवि यांनी ‘मला कारागृहात काही झाले, तर त्याचे दायित्व काँग्रेस आणि पोलीस यांच्यावर असेल’, असे लेखी तक्रार करत म्हटले आहे. त्यांचे अधिवक्ता चेतन यांनी म्हटले की, रवि यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या जिवाला धोका आहे.