Mahamandaleshwar Of Niranjani Akhara Death Threat : निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्‍वर डॉ. सुमन आनंद गिरी यांना जिवे मारण्याची धमकी !

उज्जैन  (मध्यप्रदेश) – येथील निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्‍वर डॉ. सुमन आनंद गिरी यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. ‘तुम्ही वारंवार पैगंबरांचा अपमान करत आहात. डोके आणि शरीर वेगळे करणे हीच त्याची एकमेव शिक्षा आहे’, असे या पत्रात लिहिले आहे. हे धमकीचे पत्र सगीर अहमद नावाच्या व्यक्तीने नवाबनगर, करेली, प्रयागराज या पत्त्यावरून पाठवले आहे. हे पत्र उर्दूमध्ये लिहिले आहे.

महामंडलेश्‍वरांना जिवे मारण्याची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी वर्ष २०२३ मध्ये आखाडा परिषदेच्या बैठकीत अज्ञात व्यक्तीने उर्दूमध्ये पत्र पाठवून त्यांना धमकी दिली होती. महामंडलेश्‍वरांनी मुसलमान तरुणींना सनातन धर्मात आणून आश्रमातच सनातन रितीरिवाजांनुसार त्यांचे लग्न लावून दिले होते. ‘मी सनातनचे कार्य करत आहे आणि करत राहीन’, असे महामंडलेश्‍वरांनी म्हटले आहे.

या पत्रात लिहिले आहे, ‘आम्ही आमचा धर्म आणि श्रद्धा यांचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहोत. एक दिवस राममंदिरात अजान (मुसलमानांना मोठ्या आवाजात नमाजासाठी आमंत्रित करणे) वाजवली जाईल.’

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या संत-महंतांना मारून हिंदूंना दिशाहीन करण्याचा हा डाव आहे. हे रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !