(व्यभिचार म्हणजे पतीखेरीज इतर पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवणे)
काबुल (अफगाणिस्तान) – कोणतीही स्त्री व्यभिचारात दोषी आढळल्यास तिला दगडाने ठेचून ठार मारले जाईल, असा आदेश अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारचा सर्वोच्च नेता मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा याने दिला. आम्ही अफगाणिस्तानमध्ये शरीयत कायदा परत आणू, असे त्याने म्हटले आहे.
काय आहे शरीयत कायदा ?
शरीयत कायद्यामध्ये कुटुंब, वित्त आणि व्यवसाय यांच्याशी संबंधित नियम समाविष्ट आहेत. दारू पिणे, अमली पदार्थांचे सेवन करणे किंवा तस्करी करणे, ही कृत्ये शरीयत कायद्यातील प्रमुख गुन्ह्यांपैकी आहेत. यामुळेच या गुन्ह्यांसाठी कडक शिक्षेचे नियम आहेत.
तालिबान सरकारने महिलांवर घातली बंधने !
अफगाणिस्तानात सत्तेवर आल्यानंतर तालिबानने ‘महिलांच्या हक्कांचे उल्लंघन होणार नाही’, असे आश्वासन दिले होते; मात्र तेथे मुलींच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणावर बंदी घालण्यात आली आहे. त्यांचे विश्वविद्यालयातील शिक्षण थांबवण्यात आले. महिलांना बहुतांश नोकर्यांमधून काढून टाकण्यात आले किंवा त्यांच्या जागी त्यांच्या कुटुंबातील पुरुषाला नियुक्त केले गेले. अफगाणिस्तानमध्ये महिलांचे ‘ब्युटी पार्लर’मध्ये (सौंदर्यवर्धनालयामध्ये) जाणे, खेळ खेळणे यांसारख्या अनेक कृतींवरही बंदी घालण्यात आली आहे. (याविषयी जगभरातील महिला संघटना का बोलत नाहीत ? इस्लामचे कौतुक करणारे याविषयी गप्प का आहेत ? – संपादक)
संपादकीय भूमिकातालिबान सरकार पुरुषांनाही अशा प्रकारची शिक्षा का करत नाही ? |