तुरबत (पाकिस्तान) – येथील पाक सैन्याच्या दुसर्या सर्वांत मोठ्या वायूतळावर ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’च्या (‘बी.एल्.ए.’च्या) सदस्यांनी आक्रमण केले. गोळीबार आणि बाँबस्फोट घडवून हे आक्रमण करण्यात आले. या आक्रमणानंतर तुरबतमध्ये आपत्कालीन परिस्थितीची घोषणा करण्यात आली आहे. बी.एल्.ए.च्या माजीद ब्रिगेडकडून करण्यात आलेले हे आठवड्यातील दुसरे आक्रमण आहे. यापूर्वीच पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावरही बी.एल्.ए.ने आक्रमण केले होते.
ज्या ठिकाणी चीनच्या ड्रोन्सचा तळ होता, तिथेच आक्रमण केल्याचा दावा बी.एल्.ए.ने केला आहे. या आक्रमणानंतर पाकच्या सैन्याने बी.एल्.ए.च्या ६ सदस्यांना ठार मारल्याचे सांगितले आहे. वायूदलाची मोठी हानी झाली नसल्याचे सैन्याच्या अधिकार्यांनी सांगितले. दुसरीकडे बी.एल्.ए.ने मात्र त्यांच्या आक्रमणात अनेक सुरक्षा अधिकारी ठार झाल्याचा दावा केला आहे, तसेच अनेक जण घायाळ झाल्याचेही ते म्हणाले; मात्र अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.
'Balochistan Liberation Army' (#BLA) attacks #Pakistan's second largest #navalairbase.
Turbat (#Pakistan) – Rebels from B.L.A.'s Majeed Brigade carried out the attack by firing rounds, followed by bomb blasts.
A state of #emergency has been declared in Turbat. This is the… pic.twitter.com/x3OhLTWs7h
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 26, 2024