मॉस्को (रशिया) – रशियाचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य धोक्यात आल्यास आम्ही अण्वस्त्रांचा वापर करण्यास सिद्ध आहोत, अशी चेतावणी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिली आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते. पुतिन पुढे असेही म्हणाले की, अणूयुद्ध होऊ शकते, अशा कोणत्याही गोष्टींच्या वाढीस प्रतिबंध करण्याचा अमेरिका प्रयत्न करील; मात्र रशियाची अणूशक्ती अणूयुद्धासाठी पूर्णपणे सिद्ध आहे.
युक्रेनच्या विरोधात अण्वस्त्रांच्या वापरावर विचार करण्याच्या प्रश्नावर पुतिन म्हणाले की, येथे अण्वस्त्रांची आवश्यकता नाही. युक्रेनला चर्चेसाठी नेहमीच दरवाजे उघडे ठेवले आहेत.
संपादकीय भूमिकाभारतानेही असे बोलण्याचे धाडस नेहमीच दाखवले पाहिजे ! |